नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच जागतिक बाजारातील मजबूत कल यांसारख्या घडामोडींमुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याचे दिसून आले. सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम 1300 रुपयांच्या वाढीसह नवीन विक्रमी पातळी गाठली.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’च्या माहितीनुसार, 99.9% शुद्धतेचे सोने सलग चौथ्या दिवशी मजबूत आकड्यांवर दिसून आले. सोने 1300 रुपयांनी वाढून 90750 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचली आहे. गुरुवारी सोने 89450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. त्यात आता 99.5% शुद्धतेच्या सोन्याने 1300 रुपयांची उसळी घेत 90350 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला. गुरुवारी सोने 89050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दिसून आले.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 88100 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसून आले. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 81540 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 100100 रुपयांवर गेले आहेत.