PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांना सहायता म्हणून प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. आता या संबंधित देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता उद्या (२४ फेब्रुवारी) शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष लाभ हस्तांतर द्वारे जमा होणार आहे.
उद्या (२४ फेब्रुवारी) केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करणार आहे. किसान सन्मान निधीची रक्कम प्रत्यक्ष लाभ हस्तांतर या प्रक्रियेतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र जर हा निधी तुमच्या खात्यात जमा झाला की नाही पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासावे लागेल.
अधिक माहिती अशी की, या अगोदरचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र आता या योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना एका वर्ष्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्याला २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. आता या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा १९ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही. असा करा तपास..
अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या. आता, pmkisan.gov.in असे सर्च केल्यानंतर उजव्या बाजूला ‘नो युवर स्टेटस’ असा टॅब येईल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा आणि ‘डेटा मिळवा’ असा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या टॅबच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती मिळेल.