मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. त्यात मंगळवारी शेअर बाजारात मोठी घडामोड दिसली. बाजार उघडताच मोठी झेप घेतल्याचे पाहिला मिळाले. सकाळी अकराच्या सुमारास सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांनी वाढल्याचे दिसले. तर एनएसईदेखील 250 हून अधिक अंकांनी वाढला. बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला.
सोमवारीही बाजारात तेजी दिसून आली. मंगळवारीही ही तेजी काही प्रमाणात दिसली. सेन्सेक्स 74,608.66 अंकांवर उघडला. यानंतर त्यात आणखी वाढ झाली. सकाळी 11 वाजता सेन्सेक्स 815.71 अंकांनी वाढून 74,985.66 वर पोहोचला. तो 901 अंकांच्या वाढीसह 75,071.38 वर पोहोचला होता. तर निफ्टी 239.45 अंकांच्या वाढीसह 22,748.20 वर व्यवहार करताना दिसला होता. त्यातही 250 हून अधिक अंकांची वाढ झाली आहे.
बाजारातील तेजीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर्सही वधारले. यामुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4.03 लाख कोटी रुपयांनी वाढून 397.20 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे पाहिला मिळाले. शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी रुपयांचा नफा कमावल्याचेही आकडेवारीवरून पाहिला मिळाले.