कोलकाता: कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांवर इंडियन बँक्स असोसिएशन संघटनेबरोबर झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक निकाल लागला नाही. परिणामी येत्या २४ आणि २५ मार्च रोजी होणारा त्यांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स संघटनेने म्हटले आहे.
इंडियन बँक्स असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत, संघटनेच्या सदस्यांनी सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. बैठक होऊनदेखील प्रमुख मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत, असे नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईजचे सरचिटणीस एल. चंद्रशेखर यांनी सांगितले. युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्स संघटनेने यापूर्वीही या मागण्यांसाठी संपाची हाक दिली होती.