नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम जवळ येत आहे. त्यापूर्वी आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. MCX वर सोन्याचा भाव 228 रुपयांनी वाढला, तर चांदीही 244 रुपयांनी वाढून 93,100 रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याचे दर पोहोचले 79 हजारांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनुसार, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 78718 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 23 कॅरेट सोन्याची किंमत 78403 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 72106 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 59039 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. इतकेच नाहीतर 14 कॅरेट सोन्याची किंमत 46050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 79120 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसून आले आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 73230 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 93.500 रुपयांवर गेले आहेत.