मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून बाजार तेजीत दिसत आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत बाजारात लक्षणीय घट झाली आहे. या 6 महिन्यांत सेन्सेक्स 9 टक्क्यांहून अधिक घसरला. या काळातच अनेक शेअर्समध्येही चढउतार होत राहिले. पण, एका सरकारी कंपनीचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे.
सरकारी कंपनीच्या शेअरने केवळ तीन वर्षांत सुमारे 300 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 3 लाख रुपयांचा नफा झाला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) असे या कंपनीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भेलचे शेअर्स वधारत आहेत. बुधवारी दुपारी 12 वाजता हा शेअर 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 206.70 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, मागील काही काळ या शेअरसाठी खूपच अस्थिर राहिले आहेत.
दरम्यान, गेल्या 6 महिन्यांत शेअरमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण, या काळात शेअर बाजारही घसरला. सहा महिन्यांत सुमारे 20 टक्क्यांनी शेअर मार्केट घसरला. यंदा अनेक शेअर्स काही प्रमाणात तोट्यात दिसून आले. कारण या काळात शेअर बाजारात बरीच घसरण झाली आहे.