Nagar News : अहमदनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. हा महामार्ग सुरु करण्यात आला तेव्हा पासून अनेक अपघात या महामार्गावर होताना दिसून येत आहे. दरम्यान, आयशरला भरधाव क्रुझरने धडक देत भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नीसह दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. भावाच्या लग्नावरून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. शिर्डी जवळील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटेनंतर कुटूंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात झाला अपघात
संतोष अशोक राठोड (वय ३५) त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २९) आणि मुलगी अवनी संतोष राठोड दीड वर्ष अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.(Nagar News) लग्न होऊन दोनच दिवस झालेल्या कृष्णा राठोड (वय २७) आणि त्यांची पत्नी कोमल राठोड (वय १९) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. तसेच मयत संतोष यांची आई बताबाई अशोक राठोड (वय ६५) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विरार येथील संतोष राठोड हे मूळचे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील रहिवाशी असून ते परिवारासह लहान भाऊ कृष्णाच्या लग्नासाठी जालना येथे मूळगावी आले होते. २६ जून रोजी कृष्णा राठोड यांचे जालन्याजवळील एका गावात लग्न झाल्यानंतर ते २९ जून रोजी आपल्या परिवारासह क्रुझर वाहनात बसून रात्री समृध्दी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते.
(Nagar News) कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात पोहोचल्यानंतर तेथून जाणाऱ्या आयशर टेम्पो क्र. एमएच २० सिटी ६६५६ याला क्रुझर क्र. एमएच २२ एच २५२३ याने मागून जोराची धडक दिली. या अपघातात लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला तर क्रुझर चालकासह ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : धक्कादायक..! पाथर्डीतील माळीबाभुळगावातील विहिरीत आढळले एकाचवेळी चार मृतदेह..!