Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षासह ९ जणांना बेड्या; BSNLकॉपर केबल चोरीप्रकरणी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 May 2026, 17:32

Big Breaking पुणे, ता. १० : हडपसर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री सुरू असलेल्या कॉपर केबल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पर्दाफाश केला आहे. ड्रेनेज लाईनचे झाकण उघडून बीएसएनएलच्या भूमिगत मौल्यवान कॉपर केबल्स क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत तब्बल ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Big Breaking

अस्लम सगीर खान (वय ३९, रा. तिलकनगर, दिल्ली), आरिफ कुंदुखाँ खान (वय ४०, रा. उत्तरप्रदेश), शोहेब हारुण खान (वय २५, रा. उत्तरप्रदेश), सलमान इद्रीस मलिक (वय ३३, रा. दिल्ली), नरेश कुमार श्रीशिवचरण (वय ४३, रा. हरियाणा), नवी मोहम्मद शान मोहम्मद (वय ३५, रा. उत्तरप्रदेश), अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन (वय २२, रा. हडपसर, पुणे), अफाक अन्सारी रफिक अन्सारी (वय २२, रा. हडपसर, पुणे) आणि प्रवीण दादासाहेब बागुल (वय ३३, रा. हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Big Breaking

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या आदेशानुसार ८ मे रोजी रात्री ११ ते ९ मे रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग आणि राऊंडअप ऑपरेशन सुरू होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. हनीवेल कंपनीजवळील आश्रय चहा हॉटेलसमोर काही संशयित इसम ड्रेनेज पाईपलाईनचे झाकण उघडून आत टाकण्यात आलेल्या कॉपर केबल्स क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असल्याचे समोर आले. Big Breaking

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्यांना जागीच जेरबंद केले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३४ लाख ८० हजार रुपये किमतीची कॉपर केबल, ती चोरीसाठी वापरण्यात आलेली क्रेन, आयशर ट्रक, मोपेड आणि अन्य साहित्य असा एकूण ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीमध्ये दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पुण्यातील आरोपींचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Big Breaking

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, सरताज हुसेन (रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश), अमन (रा. गोंडा, बिहार), तौफीक (रा. बदायूं, उत्तरप्रदेश), अली मोहम्मद ऊर्फ लल्लन (रा. ख्याला, दिल्ली) आणि अनिल देडे (रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) या पाच आरोपींचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. वरील सर्व आरोपींविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६० आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करीत आहेत. Big Breaking

दरम्यान, अटक आरोपी प्रवीण बागुल हा वंचित बहुजन आघाडीच्या झोपडपट्टी सुरक्षा समितीचा पुणे शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच फरार आरोपी अनिल देडे याचाही संबंधित संघटनेशी संबंध असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फरार पाच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या मागावर आहे. Big Breaking

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, शशीकांत लोंढे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, महेश गाढवे, दया शेगर, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, गणेश भुजबळ, वैभव निकम व हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बापू लोणकर, महावीर लोंढे यांच्या विशेष पथकाने केली आहे. Big Breaking

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

Baramati Murder Case : जमिनीच्या वादातून थरारक हत्याकांड; वडील, सावत्र आई अन् सावत्र भावाने काढला कायमचा काटा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.