Baramati Murder Case पुणे, ता. १० : जोगवडी (ता. बारामती) परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादाने भीषण वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांसह सावत्र आई आणि सावत्र भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Baramati Murder Case

सूरज संजय गुरुमकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता.८) रात्री त्यांचा मृतदेह घराशेजारील परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यावर गंभीर वार झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. Baramati Murder Case
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुमकर कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून तीव्र वाद सुरू होता. या वादातूनच सूरज यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. Baramati Murder Case
या प्रकरणी मृताचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तिघांची चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे जोगवडी परिसरात खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित वळणावर पोहोचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. Baramati Murder Case







