पुणे : दौंडच्या बहुचर्चित अॅट्रॉसिटी व मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष ‘बादशहा शेख’ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अजमेर (राजस्थान) मधून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
या प्रकरणी महिलेने बादशहा शेख याच्यासह २० जणांविरोधात अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग असे गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. या प्रकरणात बादशहा शेख याला अटक करावी यासाठी भाजपने अगदी रत्नागिरीतून आमदार नितेश राणे यांना मोर्चासाठी बोलावून घेतले.
त्यामुळे या प्रकाराची चर्चा राज्यभर झाली. याप्रकरणात फरार आरोपी बादशहा शेख याने बारामतीच्या सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होते. तेव्हापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते.
दरम्यान, आरोपी ‘बादशहा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अजमेर (राजस्थान) मधून अटक करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. मात्र याबाबत दौड पोलिसांकडून अजून कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही.
हि उल्लेखनीय कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक अकीत गोयल, बारामती विभागीय पोलीस उपअधीक्षक भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे व पोलीस हवालदार सचिन घाडगे यांच्या पथकाने केली असल्याची माहिती मिळत आहे.