गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे गेल्या १० वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी २०१३ मध्ये ‘श्रीं’च्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. माझी आमदार रमेश थोरात यांचे सुपूत्र तुषार थोरात यांनी व त्यांच्या साथीदारांनी जगदंब प्रतिष्ठान मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज १० वर्षे उलटली असून, तेव्हापासून ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.
स्वखुशीने देणा-यांकडूनच स्वीकारली जाते देणगी
खुटबाव हे गाव अठरा पगड जाती-धर्माचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन १० दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. (Daund News ) जगदंब प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ कोणाकडूनही देणगी घेत नाही. स्वखुशीने देणगी देणाऱ्या मंडळींकडूनच देणगी स्विकारली जाते.
मंडळातर्फे सकाळ-संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती १० दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. (Daund News ) गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. शिल्लक राहिलेल्या रकमेमधून अनाथ, गरजू मुलांना शालोपयोगी साहित्य वाटप केले जाते. अनंत चतुर्थीदिवशी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याच दिवशी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो.
Daund News : खोरवडी जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा पूजन दिन उत्साहात साजरा
Daund News : केडगाव रस्त्याची दुरावस्था; रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना साकडे