सागर जगदाळे :
Bhigvan News : भिगवण (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरून विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्रीगोंदा येथील एका वारकऱ्याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वारकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मदनवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या सकुंडेवस्ती परिसरात हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhigvan News)
लक्ष्मण मार्तंड रोडे (वय – ७५ रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) असे या अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये लक्ष्मण रोडे यांचे जावई कल्याण गुलाब घुटे (वय ४६, रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.(Bhigvan News)
सदर अपघाताबाबत भिगवन पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीपासून श्रीगोंदा तालुक्यातील पायी दिंडी वारी सकुंडे वस्तीजवळ मुक्कामी होती. या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी लक्ष्मण रोडे हे पुढील पायीवरीला मार्गस्थ होण्यापूर्वी आज गुरुवारी पहाटे प्राथमिक विधीसाठी रस्ता क्रॉस करीत होते. (Bhigvan News)
यावेळी सोलापुर बाजुकडून पुणे बाजुकडे चालले होते. यामध्ये अज्ञात वाहनाने रोडे यांना जोरदार धडक दिली. या जोराच्या धडकेत लक्ष्मण रोडे यांच्या डोक्यास तसेच उजव्या पायास गंभीर व किरकोळ दुखापती होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Bhigvan News)
सदर अपघातानंतर अज्ञात वाहनचालक अपघाताची खबर न देता वाहन घेऊन पसार झाला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोकरे हे करत आहेत. (Bhigvan News)