Pune News पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) यांचा मृतदेह राजगड किल्यावरील (ता. वेल्हे) सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास आढळून आला. (Pune News) २४ तास उलटल्यानंतरही त्यांच्या मृत्यूचे गूढ अध्याप कायम आहे. (Pune News) तर पोलिसांनी तिच्या ”मित्राचा” शोध घेण्यासाठी कसून तपास सुरु केला आहे. (Pune News)
दर्शन १० जूनला पुण्यात एका कार्यक्रमाला आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार हिने ‘एमपीएससी’ परीक्षेत यश संपादित केल्यामुळे एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दर्शनाचा सत्कार करण्यात येणार होता. हा कार्यक्रम दहा तारखेला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात झाला. मात्र या कार्यक्रमानंतर दर्शनाचा फोन लागला नाही, असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पालकांनी १२ जूनला संबंधित संस्थेत चौकशी केली असता, कार्यक्रमानंतर दर्शना तेथून गेल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे वडील दत्तात्रय दिनकर पवार (वय ४७) यांनी १२ जूनला सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, राजगड किल्यावर रविवारी सकाळी गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला.
मृतदेहाजवळ मोबाइल आणि चप्पल सापडली. त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. व या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.