इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सिकंदर बबन बागवान यांनी आपल्याकडे असणाऱ्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिकंदर बागवान हे गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर आहेत.
खासकरून इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम केले आहे. तालुक्यातील मुस्लिम सामुदायिक विवाहसोहळे आयोजनात त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. तसेच केळी व्यापारी म्हणून ते सोलापूर, पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. लोकसभेला खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात ते आघाडीवर होते. विधानसभेलाही त्यांनी पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सक्रिय काम केले आहे. दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपण वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.