छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांची आता खैर नसून चालक गुंगारा देवून पळाला, तरी पुढच्या पॉइंटवर रोखून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
गाडी वेगाने चालवायची नाही, याबाबत चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनेचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय आरटीओ कार्यालयाने इंट्री आणि एक्झीट पॉइंटवर फिरते पथक तैनात केले आहे. हे पथक महामार्गावर गस्त घालीत आहे. या पथकात तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.