आंबेगाव : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना कळंब गावातून आघाडी देण्यास कमी पडल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी (उबाठा) नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती तालुका समन्वयक तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी दिली आहे.
शिवसेना युवासेना समन्वयक रोहन कानडे, शिवसेना शाखाप्रमुख हर्षल भालेराव, शिवसेना युवासेना अध्यक्ष सुमित वर्षे, उपशाखाप्रमुख प्रमोद पिंगळे, सुशील भालेराव, संतोष भालेराव, स्वप्निल भालेराव, नितीन थोरात, निलेश भालेराव, अमित मंडलिक, सुभाष भालेराव, कुमार भोकसे, रवींद्र वर्षे या सर्व शिवसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे शिवसेना तालुका समन्वयक नितीन भालेराव यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. नितीन भालेराव यांनी देखील आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. सर्व शिवसैनिकांनी एकत्रित येत शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्याकडे पदाचे राजीनामे सुपूर्त केले आहे.
पुढील निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांचे समर्थक अलिप्त राहणार की कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याबाबत तर्कवितर्क आणि गावपातळीवरील चौकाचौकात इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चचांना उधाण आले आहे.