उरुळी कांचन, (पुणे) : शेतात नांगरणी सुरु असताना विहिरीच्या जवळ उभा असलेला ट्रॅक्टर विहरीत पडून एका 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 7 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक याखाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्टेशन जवल असलेल्या वरचा मळा परिसरात मुक्तार फार्म हाउस येथे आज शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर अपघातात मयत व जखमी झालेल्या दोघांचीही नावे अद्याप समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत मुक्तार फार्म हाउस या ठिकाणी फार्म हाउसमध्ये दत्तात्रय महाडिक हे शेतात ट्रक्टरच्या सहायाने नांगरणी करीत होते. यावेळी शेतात काम करणाऱ्या कामगारांची लहान मुलगी व एक लहान मुलगा दोघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले होते. नांगरणी झाल्यानंतर महाडिक हे विहरीत असलेल्या मोटारची वायर ही नांगरणी करतान काढून ठेवली होती. ती जोडण्यासाठी गेले होते.
यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या मुलांनी ट्रॅक्टर सुरु केला व ट्रॅक्टर सरळ कठडा नसलेल्या विहरीत निघाला. यावेळी महाडिक यांनी पळत जाऊन ट्रॅक्टर बसलेल्या मुलाला खाली ओढले तसेच मुलीला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यत ट्रॅक्टर विहरीत कोसळला. महाडिक यांनी तात्काळ मुलीला पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान, दोघांनाही उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर मुलगा सुखरूप आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.