छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील लाखेगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. देश सेवेसाठी रुजू असलेले करण कच्छे हे जवान काही दिवस गावाकडे सुट्टीसाठी आला होता. गावा जवळील विहिरीतुन पाणी शेंदत असताना त्यांची वाहिनी विहिरीत कोसळी हे त्याला कळताच जवान करण विहिरीकडे धावून गेले आणि त्यांनी विहिरीत उडी मारली पण मोठा घात झाला. तेव्हा त्यांना विहिरीतील काठावर असलेल्या दगडाचा डोक्याला जोरात मार लागल्याने मोठी दुखापत झाली.
करण यांनी आपल्या वहिनीला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्यात त्यांना यश सुद्धा आले. पण वहिनीला वाचवत असताना पाण्यातील गाळामध्ये जवान करणं फसले आणि त्याच पाण्यामध्ये त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कळताच परिसरातील सर्व नागरिकांनी गर्दी केली. महाराष्ट्र पोलीस औरंगाबाद ग्रामीणच्या वतीने सलामी देऊन राहत्या लाखेगाव या ठिकाणी जवान करण कच्चे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.