New Zealand Vs England : क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना सूरु आहे. हॅरी ब्रूक आणि ऑली पोप यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. शुक्रवारी खेळाचा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने 5 बाद 319 धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक 163 चेंडूत 132 धावा करत नाबाद आहे. त्याला कर्णधार बेन स्टोक्स (76 चेंडूत नाबाद 37) साथ देत आहे. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने 45 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर जॅक क्रॉली शून्यावर बाद झाला, तर जेकब बिथेलने 10 धावा केल्या. तर बेन डकेटने 46 धावा केल्या आहेत. या सर्वात चर्चेत राहिला तो म्हणजे ग्लेन फिलिप्सने घेतलेला अफलातून कॅच.
ग्लेन फिलिप्सचा अफलातून कॅच..
दरम्यान, न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने या सामन्यात एक अफलातून कॅच घेतलाया आहे. त्याच्या चित्त्याच्या वेगाने घेतलेल्या कॅचने स्टेडियमवरील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बोल्टच्या गोलंदाजीवर पोपचा ग्लेन फिलिप्सने हवेत झेपावत कॅच टिपला. तेव्हा पोप 77 धावांवर बाद झाला.
Glenn Phillips adds another unbelievable catch to his career resume! The 151-run Brook-Pope (77) partnership is broken. Watch LIVE in NZ on TVNZ DUKE and TVNZ+ #ENGvNZ pic.twitter.com/6qmSCdpa8u
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2024
इंग्लंड मजबूत स्थितीत..
इंग्लंडचा फलंदाज अष्टपैलू हॅरी ब्रूकने चांगली खेळी करत दुहेरी भागीदारी केली. त्याने ऑली पोपसोबत 5व्या विकेटसाठी 188 चेंडूत 151 धावा जोडल्या. त्यानंतर पोप बाद झाल्यानंतर त्याने बेन स्टोक्ससोबत 97 धावांची नाबाद भागीदारी केली आणि 98 चेंडूत 77 धावा करून ऑली पोप बाद झाला. टीम साऊदीनच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने त्याचा अप्रतिम कॅच घेतला.
न्यूझीलंडचा संघ 348 धावांवर सर्वबाद..
किवींनी दिवसाची सुरुवात 319/8 अशी केली. संघाने शेवटच्या 2 विकेट 29 धावांवर गमावत 348 धावांवर सर्वबाद झाला. 41 धावांची खेळी करणाऱ्या ग्लेन फिलिप्सने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 58 धावांवर नाबाद माघारी परतले. तर टीम साऊदी 15 धावांवर, विल्यम ओ’रुर्क शून्यावर बाद झाले.