मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून यामध्ये महायुतीला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभव वाट्याला आला आहे.. निकाल लागून आज सात दिवस झाले असले तरी अद्यापही राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? हे अजूनही ठरलेले नाही. येत्या दोन दिवसात महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्तात असले तरी शपथविधीची तारीख ठरली असल्याचे माहिती मिळत आहे. 6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. याच दिवशी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे वृत्त मिळत आहे.
तसेच संविधान समोर ठेऊन शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे हा शपथविधी सोहळा बीकेसीमध्ये होणार असल्याचे समजते. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.