पुणे : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. अतिशय चुरशीने या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे.
शरद पवार ज्यांना गद्दार म्हणाले होते त्या दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त शिवाजी निकम यांच्याविरोधात 1661 मतांनी निसटता विजय मिळवला आहे. पण त्यांचा हा विजय सहजसोपा झाला तो म्हणजे अपक्ष असलेल्या देवदत्त शिवाजी निकम या नावाच्या उमेदवाराने आणि त्याच्या चिन्हाने झाला आहे. या समान नाव असलेल्या आणि ट्रम्पेट चिन्ह असलेल्या देवदत्त निकमांनी 2,955 मतं घेतली आहे.
शेवटच्या 20 व्या फेरीत निकाल निश्चित होऊन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील 1523 मतांनी विजयी झाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी 1 लाख 6 हजार 95 मतं घेतली. तर शरद पवारांचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांनी 1 लाख 4 हजार 434 मतं मिळाली.
विधानसभेच्या निवडणुकीच्या शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेत दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केला. ज्यांना आपण सर्व काही दिलं, गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक मंत्रिपदं दिली त्यांनीच अडचणीच्या काळात साथ सोडल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे गद्दारांना पाडा असं म्हणत पवारांनी दिलीप वळसेंच्या व त्यानंतर आंबेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.