-बापू मुळीक
सासवड : पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. पोस्टल मतदान मोजणीला सकाळी सुरुवात झाली. पहिल्याच फेरीमध्ये विजय शिवतारे 1,820 मतांनी पुढे होते. शिवतारे हे 4727 मतांनी आघाडीवर तर संजय जगताप दुसऱ्या क्रमांकावर 2,907 तर संभाजी झेंडे तिसऱ्या क्रमांकावर 1,554 होते. पाचव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 21, 584 मते तर संजय जगताप यांना 14,353 असून विजय शिवतारे यांना 7,231 मताची लीड होते. दहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 44, 624 संजय जगताप 28, 117 यामध्ये विजय शिवतारे 16,507 मताने आघाडीवर होते.
15 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 67, 087, संजय जगताप 44,903 तर विजय शिवतारे यांचे 22,184 मताने लीडवर होते. 20 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 86, 465 आघाडीवर होते. तर संजय जगताप 63,701 पिछाडीवर होते. 25 व्या फेरीत अखेर विजय शिवतारे 1,0 5, 819 आघाडीवर होते. संजय जगताप 83, 584 तर विजय शिवतारे यांची आघाडी 22,235. 30व्या फेरी अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24,188 मतांनी आमदार संजय जगताप यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे.
प्रामुख्याने पुरंदर विधानसभा निवडणुकीत 61.02 टक्के मतदान झाले होते.16 उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत होते. तरी महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे तर महायुतीचे दुसरे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी लढत होताना दिसून आली. पुरंदर मधील गावागावात शिवसैनिकांनी गुलाल, भंडारा उधळला.
फटाक्याची आतिषबाजी करत ‘कोण आला रे कोण आला’ शिवसेनेचा ठाण्या वाघ आला.’ जय श्रीराम’ अशा घोषणा देत बाईक वरून रॅली काढली. शिवतारे यांच्या विजयाने शिवसैनिकांनी आनंदी, उत्साही वातावरणात आजचा दिवस चांगलाच झाला असल्याचे सांगितले. यामध्ये लाडक्या बहिणींनी विजय (बापू) शिवतारे यांना चांगलेच तारले तर शेतकऱ्यांचे वीज बिल माफी, यामुळे एसटीत महिलांना सवलत दिल्यामुळे विजय (बापू) शिवतारे याचा विजयांचा चांगलाच मार्ग सुरळीत झाला. यामध्ये शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना, अशा विविध संघटनेच्या माध्यमातून महायुतीचा धर्म पाळून एकजुटीने पुरंदर हवेली मध्ये पहिल्यापासून ते शेवटपर्यंत चांगलेच मताधिक्य शिवतारे यांना लाभल्यामुळे विजयाचा मार्ग सुरळीत झाला.