पुणे : पुणे शहरात येणाऱ्या हडपसर मतदारसंघात कायम नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आहे. या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झाली. यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चेतन तुपे यांनी 7122 मतांनी विजय प्राप्त केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा पराभव केला आहे.
चेतन तुपे यांना 134810 मतं मिळाली आहेत. तर प्रशांत जगताप यांना 127688 एवढी मतं मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवणारे साईनाथ बाबर यांनी 32821 घेतली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना केवळ 6584 मतदारांनी पसंती दिली आहे.
दरम्यान यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपेंना मतदार पुन्हा संधी देणार की शरद पवार आणि राज ठाकरेंचे उमेदवार विजयी पताका फडकवणार याची उत्सुकता सर्वत्र होती. अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांनी विजय मिळवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धोबीपछाड दिला आहे. तसेच तुपे यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याची किमया साधली आहे.