अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीत आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राजू तोडसाम हे 1 लाख 27 हजार 203 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे भाजपा उमेदवार संदीप धुर्वे यांचे कडून 3 हजार 153 मतांनी पराभूत झाले होते.
आर्णी विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमाती साठी राखीव असून आर्णी विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या 22 लाख 25 हजार 65 असुन 11 लाख 39 हजार 867 पुरुष, तर 10 लाख 85 हजार 138 महीला व 60 तृतीय पंथी मतदार आहेत. तथापि, राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी विरूद्ध पराभूत झाले होते.
तसेच माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे 2014 मध्ये आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राजू तोडसाम विरुद्ध पराभूत झाले होते. 2019 मध्ये भाजपाचे संदीप धुर्वे यांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता. एकंदरीत 2024 च्या आर्णी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र शिवाजीराव मोघे हे जवळपास 30 हजार मतांनी पराभूत झाल्याने माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे राजकारण संपुष्टात आल्याची चर्चा यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे.