मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. वानखेडे स्डेडियम किंवा शिवाजी पार्कवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीने डबल सेंचुरी मारली आहे. महायुतीन 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने अर्धशतक केले आहे. महाविकास आघाडीला 56 जागा मिळताना दिसत आहे. निकालात भाजपला 133, शिवसेना 56 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 40 जागा मिळवताना दिसत आहे.
वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी पार पडणार आहे. याआधी 2014 सालीही याच वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.