मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीने डबल सेंचुरी मारली आहे. महायुतीन २२५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने अर्धशतक केले आहे. महाविकास आघाडीला 5६ जागा मिळताना दिसत आहे. निकालात भाजपला 1३३, शिवसेना 5६ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा मिळवताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस 20, शिवसेना उबाठा 19 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 1७ जागा मिळत आहे. निकालाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा दावा केला जात होता. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन भांडण देखील सुरु झाले होते. परंतु, आता त्यांना विरोधी पक्षनेते पदसुद्धा मिळणार नाही. यावेळी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे. त्याला कारण आहे म्हणजे घटनेतील एक नियम.
नेमका काय आहे तो नियम
महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनी घटनेतील संबंधित नियमाची माहिती दिली आहे. देशाची लोकसभा असो की राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस 20, शिवसेना उबाठा 19 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 1७ जागा मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी 2९ चा जादूई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आता राज्यात विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे.
दरम्यान 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. कारण या दोन्ही निवडणुकीत देशातील कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळवता आल्या नव्हत्या. देशात एकूण 543 जागा आहे. त्यापैकी 55 जागा कोणत्याही पक्षाला मिळायला हव्या होत्या. परंतु, एकाही विरोधी पक्षाला या जागा मिळाल्या नाही. काँग्रेसला 2014मध्ये 44, तर 2019ला 52 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामुळे लोकसभेत दहा वर्ष विरोधी पक्षनेताच नव्हता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्याने आता विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना मिळाले.