Mahim Election Result 2024 : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मतमोजणी सुरु आहेत. माहिम मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत. तिरंगी लढतीत अमित ठाकरे तिस-या स्थानावर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे आघाडीवर आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत.
गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. या पार्श्वभूमीवर, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होत आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट इथे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांनी गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. दरम्यान, मनसेच्या अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या मतांमध्ये फार थोडा फरक आहे.